तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील, किरीट सोमय्या यांचा मुश्रीफ यांना चिमटा
कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांसह ठाकरे गटावरही निशाणा साधला.
हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांसह ठाकरे गटावरही निशाणा साधला.
या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांच्या सर्व घोटाळ्यांचा सोमय्यांनी समाचार घेतला. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अस्तित्वात नसताना 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यात आले. हे पैसे का आलेत? याचे उत्तर द्या…बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात हे कोल्हापूरकरांना कळू द्या, त्यांना सांगा. हे पैसे कसे आले हे त्यांना कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील, असा किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांना चिमटा काढला. यासोबतच, हसन मुश्रीफ प्रकरणाची चौकशी होणारच असे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सोमय्यांनी सांगितले.