Kirit Somaiya : ‘… तर मिया मुश्रीफ यांनी अडवून दाखवावं’, सोमय्यांचा इशारा
किरीट सोमय्या यांचे हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या समर्थकांना चॅलेंज
ईडीच्या धाडसत्रानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झालेत. हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली असून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
या धाडसत्रामागे नेमका कोणाचा हात आहे, हे माहित असून यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खुशाल कोल्हापुरात येऊन देवीचं दर्शन घ्यावं. त्याला आमची ना नाही, असे स्पष्टच सांगितले. मात्र या वक्तव्यानंतर किरीट सोमय्यांनी मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले आहे.
‘मिया मुश्रीफमध्ये आडवण्याची आणि थांबवण्याची ताकद राहिली आहे का? मुश्रीफ म्हणाले होते की, मी मुस्लिम आहे म्हणून माझ्याकडून त्यांना टार्गेट केले जात आहे. पण मागच्यावेळी पण मला अंबाबाईच्या दर्शनापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा काय परिस्थिती झाली होती. त्यामुळे आता पुन्हा हिंमत असेल तर अडवून दाखवा’, असे म्हणत मुश्रीफ यांना सोमय्यांनी इशारा दिला आहे.