नागपुरातील ‘मविआ’च्या १६ तारखेच्या सभेला भाजपचा विरोध, काय कारण?
VIDEO | १६ एप्रिल रोजी नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेचे आयोजन, मात्र या भाजप नेत्याने सभेची परवानगी रद्द करण्याची केली मागणी
नागपूर : १६ एप्रिल रोजी नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या भाजप नेत्याने सभेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे. या सभेसाठी एनआयटीने परवानगी दिली आहे. परंतु स्थानिकांनी या सभेला विरोध केला आहे. ज्या मैदानात ही सभा होत आहे ते मैदान खेळासाठी राखीव आहे. त्यामुळे या ठिकाणी सभा होऊ नये असं स्थानिक तसेच खेळाडूंचं म्हणण आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी हा मुद्दा उचलून धरला. ही सभा रद्द करावी. सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. नागपुरातील दर्शन कॉलोनी मैदानात वज्रमुठ सभा घेण्यास विरोध करण्यात आलाय. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि भाजप माजी नगरसेवकांनी NIT ला पत्र पाठवून परवानगी रद्द करण्याची मागणी केली. महाविकास आघाडीच्या सभेला दिलेली परवानगी NIT ने रद्द करावी, यासाठी आमदार खोपडे यांनी पत्र लिहीलं.