Amit Shah : 'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन् दिल्ली ते मुंबईपर्यंत विरोधक आक्रमक

Amit Shah : ‘आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे…’, अमित शाहांचं एक वक्तव्य अन् दिल्ली ते मुंबईपर्यंत विरोधक आक्रमक

| Updated on: Dec 18, 2024 | 5:06 PM

आजकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं आजकाल फॅशन झालं आहे. पण आंबेडकरांऐवढं देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. दरम्यान, अमित शाहांनी केलेल्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाहांवर कारवाई करावी, अन्यथा नरेंद्र मोदी यांनी सत्ता सोडावी, असं म्हणत भाजपवरच हल्लाबोल केलाय. काँग्रेसवाल्यांनी शेण खाल्लं, तुम्हालाही शेण खाणं […]

आजकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं आजकाल फॅशन झालं आहे. पण आंबेडकरांऐवढं देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. दरम्यान, अमित शाहांनी केलेल्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाहांवर कारवाई करावी, अन्यथा नरेंद्र मोदी यांनी सत्ता सोडावी, असं म्हणत भाजपवरच हल्लाबोल केलाय. काँग्रेसवाल्यांनी शेण खाल्लं, तुम्हालाही शेण खाणं मंजूर आहे का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. यावर बोलताना विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी शहांच्या वक्तव्यानंतर सारवासारव केल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह यांचं वक्तव्य म्हणजे जुनी मानसिकता, त्यांच्या वक्तव्यातून भाजपचा जळफळाट दिसला. आरएसएस आणि भाजपनेच आंबेडकरांना विरोध केलाय, अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अमित शाहांच्या वक्तव्याचा विरोधक करत लोकसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर राज्यसभेतही अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या सभागृहातही जय़भीमच्या घोषणा देण्यात आल्या. इतकंच नाहीतर सभागृहाच्या बाहेरही विरोधकांनी जोरदार निदर्शनं केलीत आणि अमित शाहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मोदी शहांच्या मदतीला धावलेत. बघा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

Published on: Dec 18, 2024 05:06 PM