विनोद तावडे महाराष्ट्रात कमबॅक करणार? चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ वक्तव्यानं चर्चा
विनोद तावडे यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
विनोद तावडे यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तर विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्यायांची चर्चा सुरू असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. “विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी आजपर्यंत दिली, ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते. ती संधी सुद्धा ते यशस्वीपणे पार पाडतील” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ती जबाबदारी कोणती असेल? यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी अधिक काही माहिती दिली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jun 11, 2024 05:13 PM
Latest Videos