मुंगेरीलालपेक्षा भयंकर स्वप्न संजय राऊतांना पडतात, भाजपच्या बड्या नेत्याचा निशाणा
'ईडी, सीबीआयने फायली बंद केल्या त्या ओपन केल्या तर नाराय राणे तिहार जेलमध्ये जातील.’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी करत नारायण राणेंना इशारा दिला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे
‘दोन महिन्यात आमची सत्ता येतेय. त्यांच्या ईडी, सीबीआयने फायली बंद केल्या त्या ओपन केल्या तर नाराय राणे तिहार जेलमध्ये जातील.’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी करत नारायण राणेंना इशारा दिला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत म्हणताय, आमचं सरकार आलं तर आम्ही नारायण राणे यांना जेलमध्ये टाकू. आता केंद्रामध्ये यांचं सरकार केव्हा येणार? 4 तारखेचा निकाल लागू द्या आमचं सरकार येणार आहे आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार आहे. आता काय बोलावे लोकांना? असं वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी मुश्किल भाष्य करत संजय राऊत यांच्यावर टीका केली. किती यांचे मुंगेरीलाल के हसीन सपने… मुंगेरीलालही असे स्वप्न बघत नव्हता. इतके भयंकर स्वप्न संजय राऊत यांना पाडायला लागले आहे, असे म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.