‘मी सांगितलेला आकडा एकदम परफेक्ट असतो’, गिरीश महाजन यांनी काय केला मोठा दावा?
VIDEO | इंडिया नावावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा इंडिया आघाडीवर निशाणा तर देशातील 325 लोकसभेच्या तर महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार, असा गिरीश महाजन यांनी केला दावा.
धुळे, ८ सप्टेंबर २०२३ | भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी इंडिया नावावरून इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘कुठल्याची प्रकारचे नाव ठेवले तरी काही फरक पडणार नाही ‘ यासोबत गिरीश महाजन यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोठा दावाही केला आहे. महाजन धुळ्यात असताना म्हणाले, ‘काँग्रेस किती जागा लढतील आणि किती जिंकून येतील हे वेळच सांगेल. मी आधीच सांगितलं आम्ही ४८ जागा जिंकणार आहोत. मी सांगितलेला आकडा एकदम परफेक्ट असतो. माझ्या सांगण्यात काही चूक होत नाही. देशातील ३२५ लोकसभेच्या तर महाराष्ट्राच्या ४८ लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत’ काँग्रेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या ३२ जागा जिंकू असं म्हणत आहे तो विनोद असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. आम्ही संपूर्ण जागा जिंकू आणि लोकसभेत देखील ३२५ जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.