Manoj Jarange Patil : … तुमच्याकडून ते पण होत नाही आरक्षण काय देणार? गिरीश महाजन यांचा जरांगे पाटील यांना फोन; काय झाली चर्चा?
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, आमरण उपोषण आजपासून सुरू... गिरीश महाजन यांचा जरांगे पाटील यांना फोन, म्हणाले, 'तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. हा आमचा शब्द आहे. मागच्या वेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. त्यामुळे...'
जालना, २५ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपला असून सरकारने कोणताही निर्णय दिला नसल्याने जरांगे पाटलांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मात्र यापूर्वीच राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी महाजनांनी जरांगेना उपोषणाला बसू नका, अशी वारंवार विनंती केली. मात्र उपोषणाचा निर्णय मागे घेणार नाही. असे थेट उत्तर जरांगेनी गिरीश महाजन यांना दिले. यानंतरही महाजन यांनी जरांगे पाटील यांना विनंती केली. तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. हा आमचा शब्द आहे. मागच्या वेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही आरक्षण देणारच आहोत. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका, असे गिरीश महाजन म्हणाले. यावेळी जरांगे म्हणाले, तुम्ही दोन दिवसात गुन्हे मागे घेतो असे म्हटला होता. अजूनही घेतले नाही. गुन्हे मागे घेतले नाही, आरक्षण काय देणार? असा सवालच महाजनांना त्यांनी केला आहे.