चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ‘या’ मंत्र्यांचं नाव समोर

| Updated on: Dec 15, 2024 | 2:39 PM

महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री आज मंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची माहिती

भारतीय जनता पक्षाते नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज नागपुरात दुपारी चार वाजता महायुती सरकारच्या मंत्र्यांचा मंत्रिपदासाठी शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. १९९१ नंतर पहिल्यांदाच नागपूर मध्ये मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडतोय. अशातच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणते नेते मंत्री म्हणून शपथ घेणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री आज मंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याची माहिती आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी नागपुरात दाखल होत आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाते नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Published on: Dec 15, 2024 02:39 PM