‘या’ व्हिलनमुळे मराठा तरूणांची आत्महत्या, भाजप आमदारानं थेट नाव घेत कुणावर केला हल्लाबोल?
VIDEO | मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटचा काहीच कालावधी शिल्लक असताना सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले असताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट नाव घेत हल्लाबोल केलाय
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटचा काहीच कालावधी शिल्लक असताना सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागलेय. अशातच भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. जो माणूस एक मुलगा, एक बाप, एक पक्षप्रमुख, एक मुख्यमंत्री म्हणून फेल्युअर झाला, त्या उद्धव ठाकरेंचा कामगार आज आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फेल्युअर म्हणण्याचे धाडस दाखवतो. मराठा समाजाला जे आरक्षण हवे, ते कसे द्यायचं यासाठी सरकारची जोरदार तयारी सुरू आहे. पण मराठा समाजाचा खरा व्हिलन, ज्यांच्यामुळे आज मराठा समाजाच्या तरुणांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे, असे म्हणत नितेश राणेंनी हल्लाबोल केलाय.
Published on: Oct 23, 2023 03:26 PM
Latest Videos