संजय राऊत यांचा काळं मांजर म्हणून उल्लेख, कुणी केली बोचरी टीका?
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सडकून टीका केली. या टीकेवर प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे चांगल्या कामात...
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सडकून टीका केली. या टीकेवर प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे चांगल्या कामात अडवं येणारं काळं मांजर असल्याचे नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जातात, तेव्हा राज्यातील प्रश्न सुटावे म्हणून ते केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात असतात, पण ठाकरे सत्तेत असताना त्यांना जमले नाही. महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होतेय. राज्यातील पाण्याचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटताय हे त्यांना बघवत नाही. त्यामुळे त्यांची फडफड होत आहे. २०२४ मध्ये त्यांना माहिती आहे. त्यांचे ना खासदार येणार ना आमदार येणार सगळी दुकानं बंद होणार म्हणून त्यांची फडफड होतेय, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.