‘शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू…’, नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. अशातच सत्तेतील काही नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात असल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच विरोधकांनीही सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधल्याचे दिसतेय.
भगवी टोपी घालणाऱ्या महाराजांनी इतर समाजाबद्दल विषारी वक्तव्य करणं हे अनुचित असल्याचे विधान शरद पवार यांनी केलं आहे. सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशी वक्तव्य कोणी करू नये, असेही आवाहन शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना केली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी थेट प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी कधी तरी हिंदूंची बाजूही लावून धरावी, असे नितेश राणे यांनी म्हटलंय. ‘ज्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शरद पवार गेले होते आणि गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर काही लोकांनी दगडं भिरकावली, चप्पला फेकल्या.. इतकंच नाहीतर मुर्तीची विटंबना करण्यात आली त्यावेळी शरद पवार यांनी साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदूंना बरं वाटलं असतं’, असेही नितेश राणे यांनी म्हटले.