Devendra Fadnavis : 'ते मी सांगत नाही केक वैगरे...', राहुल नार्वेकरांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीसांना सांगितला 'तो' किस्सा

Devendra Fadnavis : ‘ते मी सांगत नाही केक वैगरे…’, राहुल नार्वेकरांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीसांना सांगितला ‘तो’ किस्सा

| Updated on: Dec 09, 2024 | 12:31 PM

विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड कऱण्यात आल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं

भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड कऱण्यात आल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं. ‘कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले राहुल नार्वेकर अतिशय तरूण वयात विधानसभा अध्यक्ष झाले. गेल्या अडीच वर्षात त्यांनी वेगळी प्रतिमा तयार केली आहे. गेले ५ वर्ष महाराष्ट्रातील राजकारणाचा संक्रमण काळ होता. अशातच काही वर्ष त्यांच्या ज्ञानाचा कस लागला होता. पुन्हा विधानसभाध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चार जणांना मिळाला. त्यात राहुल नार्वेकर आहेत. सर्वाधिक चर्चेत राहुल नार्वेकर होते. त्यांच्या रुपाने अभ्यासू व्यक्तिमत्व विधानसभा अध्यक्षपदी निवडले गेले.’, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पुढे देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले, विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. सभागृहातील सगळ्या सदस्यांसाठी राहुल नार्वेकरांचे अध्यक्षांचे दालन सर्व पक्षातील सर्व सदस्य सातत्याने जायचे. कितीही भांडण झाले तरी अध्यक्षांच्या दालनात वाद संपलेले असायचे. अध्यक्ष दोन्ही बाजूचे ऐकतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्साही यावेळी सांगितला.

Published on: Dec 09, 2024 12:31 PM