Eknath Shinde : शिंदेंनी सभागृह गाजवलं... नाना पटोले, शरद पवार अन् ठाकरेंवर बरसले, काय केली टोलेबाजी?

Eknath Shinde : शिंदेंनी सभागृह गाजवलं… नाना पटोले, शरद पवार अन् ठाकरेंवर बरसले, काय केली टोलेबाजी?

| Updated on: Dec 09, 2024 | 1:04 PM

आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सुरू असलेल्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं.

विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार आलंय. निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली. यानंतर आता राज्यात विशेष अधिवेशन सुरू आहे. अशातच आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सुरू असलेल्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस यांना देखील कोपरखळी मारली. इतकंच नाहीतर नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करत एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. ‘पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन. ते ‘मी पुन्हा येईन’,बोलले नव्हते, तरीही आले. देवेंद्र फडणवीस हे ‘मी पुन्हा येईन’ सांगून आले. तर गेल्यावेळी नाना पटोले राहुल नार्वेकर यांना म्हणाले होते की डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या पण जनतेनेच डाव्या बाजूची जास्त काळजी घेतली आहे. आता विधानसभा अध्यक्ष डाव्या बाजूला अधिक लक्ष देतील, सूक्ष्मपणे बघतील. ते कोणावरही अन्याय करणार नाही, याची खात्री बाळगा’, असं म्हणत शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Published on: Dec 09, 2024 01:04 PM