‘हा’ लोकशाहीच्या धोक्याचा घंटा, मुनगंटीवार यांचा विरोधकांना टोला, विरोधी पक्षनेत्यावरूनही थेट सवाल
विधिमंडळात बीएमसीतील लोढा यांच्या कार्यालयावरून जोरदार घमासान पहायला मिळाल्यानंतर. शेतकरी प्रश्नावरूनही भाजप-काँग्रेसचे नेते आमने-सामने आले. यावेळी बाळासाहेब थोरातांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
मुंबई, 29 जुलै 2023 | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विरोधकांत आणि सत्ताधरी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्र्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले. विधिमंडळात बीएमसीतील लोढा यांच्या कार्यालयावरून जोरदार घमासान पहायला मिळाल्यानंतर. शेतकरी प्रश्नावरूनही भाजप-काँग्रेसचे नेते आमने-सामने आले. यावेळी बाळासाहेब थोरातांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून सवाल भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट थोरातांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकहितकारी निर्णय घोषित केले. मात्र विरोधक ब्रेकर बनत आहेत. त्यांनी इतक्या कोत्या मनाने कुणीही वागता कामा नये अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. त्याचबोरबर आता अधिवेशनही संपण्याच्या मार्गावर असताना देखील विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाही. यावरून त्यांनी विरोधकांना घेरतना घणाघात केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता आजपर्यंत घोषित का करण्यात आला नाही, हे मला जाणून घ्यायचं आहे. हे मला तसेच महाराष्ट्रातील जनतेला जाणून घ्यायचं आहे. विरोधी पक्षनेता घोषित न करता सरकारच्या निर्णयाला विरोध करणं, हा लोकशाहीच्या धोक्याचा घंटा असल्याची टीका देखील मुनगंटीवार केली.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
