बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, भाजपच्या अनिल बोंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपच्या अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदुरबाजार न्यायालयाने निवडणूक लढते वेळी प्रतिज्ञापत्रात मुंबई मधील प्लॅटची माहिती लपवल्याने 2 महिने सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा चांदुर बाजार न्यायालयाने सुनावणी होती.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपने केली. महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री घोटाळेबाज आहे, अशी टीका भाजपच्या अनिल बोंडे यांनी केली.
Latest Videos