‘भविष्यात गर्व से कहो हम MIM है म्हणतील’,उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचा निशाणा?
VIDEO | लांघुलचालनाच्या राजकारणाची सुरूवात केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी केली आहे. हे संपूर्ण समाज पाहतोय. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा गर्व से कहो हम हिंदू है... आता ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी गर्व से कहो हम समाजवादी है...अशी केली आहे.
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार म्हणाले, लांघुलचालनाच्या राजकारणाची सुरूवात केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी केली आहे. हे संपूर्ण समाज पाहतोय. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा गर्व से कहो हम हिंदू है… आता ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी गर्व से कहो हम समाजवादी है…अशी केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर गर्व से कहो हम एमआयएम है, असेही व्हायला कमी पडणार नाही, असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर आम्हाला प्रश्न विचारण्याची ठाकरे यांनी करावी, जो स्वच्छ आहे. उद्धव ठाकरे तुमच्या घरात दाऊदचा जावाई आणि पाकिस्तानचा खेळाडू जावेद मियाँदादला ज्यांनी बिर्याणी खाऊ घातली, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, आमच्या भानगडीत पडू नये, असे म्हणत आशिष शेलार यांनी इशारा दिला आहे.