राज ठाकरे यांच्या नोटबंदीच्या 'त्या' टीकेवरुन आशिष शेलार यांचा पलटवार; म्हणाले, 'सुटलेल्यांना...'

राज ठाकरे यांच्या नोटबंदीच्या ‘त्या’ टीकेवरुन आशिष शेलार यांचा पलटवार; म्हणाले, ‘सुटलेल्यांना…’

| Updated on: May 21, 2023 | 6:09 PM

VIDEO | नोटबंदीच्या टीकेवरुन आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना घेरलं, बघा काय म्हणाले...

मुंबई : माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर मी बोलणार, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं आहे. तर सुटलेल्यांना धरण्यासाठी नोटबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचे म्हणत राज ठाकरे यांच्या नोटबंदीच्या टीकेवरून आशिष शेलार यांनी हा पलटवार केला आहे. शेलार म्हणाले, तुम्ही मोठे नेते आहात. पण माझ्या पक्षाविषयी आणि माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर बोलाल तर लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला. नोटाबंदी झाली त्याचवेळी मी बोललो होतो. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारून नोटाबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती. तेव्हा नोटा आल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नोट एटीएममध्ये जाईल की नाही याचा विचारही तेव्हा केला नव्हता. असले निर्णय परवडणारे नसतात. उद्या बँकेत पैसे टाकायचे. नंतर नवीन नोट आणणार. असं काही सरकार चालतं का? राज ठाकरे यांनी असा सवाल उपस्थित केला होता.

Published on: May 21, 2023 06:03 PM