Ashish Shelar | सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न – आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागत, असे आशिष शेलार म्हणाले.
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागत. संजय राऊत तेच करत आहेत. मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणी जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला बोलावं का लागत आहे ? सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे आपल्या अंतर्गत असलेला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तसेच तुम्ही दुबळे आहात आणि त्यापासून पळण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे, असेही आशिष शेलार म्हणाले.
Latest Videos