Sanjay Raut Video : ‘संजय राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्…’, भाजपच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
सांभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. फक्त एक व्यक्ती प्रवेश करू शकेल अशी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद करण्यात आलाय.
बजरंग दलाने औरंगजेबाची कबर उकरून टाकण्याचा इशारा दिला आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं. खुलताबादमधील औरंगजेबाची कबर असलेल्या भागात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. केवळ एक व्यक्ती फक्त प्रवेश करू शकेल अशी बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजाही आता पोलिसांकडून बंद करण्यात आलाय. तर याच मुद्द्यावरून राजकारणही आता चांगलच तापू लागले आहे. दरम्यान, ‘४०० वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत. पण तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळालेल्या त्याच्यावर बोला. या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता, शेतकऱ्यांनी आत्महत्या त्यावरती कोणाला संवेदना नाहीत’, असं संजय राऊत यांनी म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय. ‘ज्यांच्या मेंदूचेच दोन भाग झालेले आहेत आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहता आहेत ती म्हणजे मला सत्तेची भूक आहे या पद्धतीने काम करणारे संजय राऊत आहेत. होय दोन तुकडे जरूर आहेत. अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, एनडीए महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा सगळी मंडळी आणि ते दोन विभाग एवढेच आहेत राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय. जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना खत-पाणी घालतात ते कोणाकडे आहे याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं, असं म्हणत राऊतांच्या टीकेवर भाजपच्या आशिष शेलार यांनी पलटवार केलाय.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
