'उद्धव ठाकरे दिल्लीत कटोरा घेऊन गेलेत अन्...', भाजपच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

‘उद्धव ठाकरे दिल्लीत कटोरा घेऊन गेलेत अन्…’, भाजपच्या बड्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Aug 07, 2024 | 5:53 PM

Uddhav Thackeray in new delhi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तीन दिवसांकरता नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ठाकरे विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेणार आहे. मात्र यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तीन दिवसांकरता नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘उद्धव ठाकरे तीन दिवसांसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांना एकच सवाल आहे, ते काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का?’, असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे आशिष शेलार असेही म्हणाले की, तुम्ही दिल्ली महाराष्ट्राच्या हितासाठी गेले नाहीत. दिल्लीत गेलेत ते कटोरा घेऊन गेले आहेत इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे हे दिल्लीत काँग्रेसश्वरांची भांडी घासायला गेले असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाष्य करताना जिव्हारी लागणारी टीका आशिष शेलारांनी त्यांच्यावर केल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

Published on: Aug 07, 2024 05:53 PM