आशिष शेलार फस्ट्रेशनमध्ये, त्यांना थेरपीची गरज, आदित्य ठाकरे यांची जळजळीत टीका
दंगली भडकवण्याचे काम ही राजवट, घटनाबाह्य सरकार करत आहे. जनता या राजवटीला दार दाखवेल ही खात्री आहे. ड्रग विरोधात मोर्चा आम्ही काढला. हा विषय आम्ही घेतलाय. गृहमंत्र्यांनी त्यावर ऍक्शन तर घ्यावी.
पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : आज प्रत्येक विषयात जनतेचा रोष दिसत आहे. जनता रत्यावर येत आहे. आधी गृहमंत्र्यांनी नक्की सांगावं त्या आंदोलकांवर लाठीचार्ज कुणी केला? करायला सांगितला होता ? मुख्यमंत्र्यांचा आदेश होते की उपमुख्यमंत्र्यांचे? कुठे ही शेतकऱ्यांना मदत गेलेली नाही. कृषि आणि उद्योग क्षेत्र कोलमडले आहे, अशी टीका युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. आरोप करणारे जे गृहस्थ आहेत. त्यांना थेरपीची गरज आहे. त्यांना प्रेमाची गरज आहे. त्यांच्या पक्षातून त्यांना काही न मिळाल्यामुळे एक रोष आहे तो बाहेर येत आहे. फस्ट्रेशन आहे आणि यात आमचा काही संबंध नाही. मंत्री आणि त्यांच्यातला वाद असावा. मंत्री काम कसे करत नाही. इथले आधीचे पालकमंत्री. त्यांना वरिष्ठांना दाखवायचं असेल. मतदार सुशिक्षित आहेत. त्यांच्यावर एवढं राग आणि महाराष्ट्रावर राग, द्वेष कशासाठी? यांना सिनेट निवडणूक घेण्याचीही हिम्मत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.