'लबाड लांडगा ढोंग करतोय', भाजप नेत्याचा आदित्य ठाकरे यांना खोचक टोला; काय केलं ट्वीट?

‘लबाड लांडगा ढोंग करतोय’, भाजप नेत्याचा आदित्य ठाकरे यांना खोचक टोला; काय केलं ट्वीट?

| Updated on: Aug 08, 2023 | 8:25 AM

VIDEO | गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत काय-काय घटना घडल्यात, याची आठवण करून देत भाजप नेत्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय!! असे म्हणत भाजप नेता आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, 26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले तर संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले’, अशा दुर्दैवी घटनांची आठवण करून देत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. तर मुंबई गेल्या २५ वर्षात या घटना घडल्या तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा…! आणि आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! असे म्हणत शेलार यांनी टोलाही लगावला आहे.

Published on: Aug 08, 2023 08:24 AM