PFIच्या पाकिस्तान जिंदाबाद घोषणाबाजीवर उद्धव ठाकरेंचं मौन? भाजपने डिवचलं, शेलार म्हणतात..
PFIवर NIAकडून कारवाई, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानं राजकारण तापलं, शिवसेनेची भूमिका काय?
मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. पीएफआयने (PFI) दिलेल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवर उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. तसच एनआयएने पीएफआयवर केलेल्या कारवाईतं उद्धव ठाकरेंनी ना समर्थन केलं, आणि ना पीएफआयचा निषेध केला, असं म्हणत निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे या सगळ्या प्रकरणावर गप्प का आहेत? असा प्रश्न शेलार यांनी ट्वीट करत विचारलाय. ‘कोथळा काढण्याची भाषा करणारे आता कोणत्या बिळात बसले आहेत’ असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. भाजप, मनसे पीएफआय (पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया) च्या विरोधात आक्रमक झालीय. या संघटनेला टेटर फंडिग होत असल्याचा आरोपातून एनआयएनं कारवाई केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचंय.

पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..

भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक

...तर ते अॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला

अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
