भाजपच्या चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाणांचा दौरा, मात्र प्रचाराशिवाय फिरले माघारी

भाजपच्या चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाणांचा दौरा, मात्र प्रचाराशिवाय फिरले माघारी

| Updated on: Apr 02, 2024 | 9:38 AM

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात चव्हाणांचा दौरा होता. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी ते गावात आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. मात्र त्यानंतर त्यांनी चव्हाणांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. नेमकं काय घडलं?

नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी भाजप नेते अशोक चव्हाण कोंढा गावात गेले होते. मात्र मराठा आंदोलकांच्या रोषामुळे अशोक चव्हाण यांना त्या गावातून काढता पाय घ्यावा लागला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात चव्हाणांचा दौरा होता. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी ते गावात आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. मात्र त्यानंतर त्यांनी चव्हाणांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. गावात घडलेल्या प्रकारामागे विरोधकांचा हात असावा असा अशोक चव्हाण यांचा सूर आहे. मात्र अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. तेव्हाही त्यांच्यात आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 02, 2024 09:38 AM