Chandrakant Patil : विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...

Chandrakant Patil : विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्…

| Updated on: Dec 04, 2024 | 12:58 PM

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एकमताने सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. भाजपचे केंद्रीय निरिक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने ही निवड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ‘मी महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र जी सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव सूचवत आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर सुधीर मुनंगटीवार यांनी ‘मी विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र जी सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतो’ असे म्हटले. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एकमताने सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. भाजपचे केंद्रीय निरिक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने ही निवड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवड करण्यात आली नव्हती. मात्र भाजपकडून आज 4 डिसेंबर रोजी विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. यामध्ये गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. भाजपच्या आमदारांकडून प्रस्तावावर अनुमोदन दिले. त्यानंतर अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

Published on: Dec 04, 2024 12:58 PM