Chandrakant Patil : तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवं UNO संयुक्त राष्ट्र उभारतील, चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
tv9 Marathi Special Report | भाजप नेते चंद्रकांत पाटील आपल्या दाव्यांना पुन्हा चर्चेत आले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी मुस्लिम आक्रमणामुळे हिंदू महिला घरातच राहिल्या. याशिवाय जर संयुक्त राष्ट्रात सदस्यत्वास नकार मिळाला. तर मोदी... चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील आपल्या दाव्यांना पुन्हा चर्चेत आले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी मुस्लिम आक्रमणामुळे हिंदू महिला घरातच राहिल्या. याशिवाय जर संयुक्त राष्ट्रात सदस्यत्वास नकार मिळाला. तर मोदी नव्या संयुक्त राष्ट्राची उभारणी करतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांचे दावे नेहमीप्रमाणे यावेळीही चर्चेत आले आहेत. पाटलांनी आता असं म्हटलंय की, भारतात शेकडो वर्षांपूर्वी महिलांना आरक्षण होतंच, मात्र १२०० व्या शतकात मुस्लिम आक्रमणकारी भारतात आल्यानंतर त्यांनी मंदिरं आणि महिलांना लक्ष्य केलं. त्यांच्यापासून बचावासाठीच महिलांना घरात ठेवलं गेलं. यावरुन विरोधक चंद्रकांत पाटलांच्याच जुन्या विधानावरुन त्यांना प्रश्न करतायत. पाटलांचा दुसरा दावा आहे की, जर प्रगत राष्ट्रांनी यूएनचं सदस्यत्व न देण्याचं ठरवलं तर मोदी नवीन युनो उभं करतील आणि तेव्हा भारतानं कोरोना काळात ज्या ६० देशांना मदत केली ते मोदींना पाठिंबा देतील असं पाटील म्हणालेत. बघा स्पेशल रिपोर्ट