अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

| Updated on: Dec 05, 2021 | 8:26 PM

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत? असा सवाल या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. कुबेर कसं लिहितात त्यापेक्षा ते खूप मोठे लेखक विचारवंत आहेत. पहिली प्रतिक्रिया कृतीवर आहे.

पुणे: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत? असा सवाल या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. कुबेर कसं लिहितात त्यापेक्षा ते खूप मोठे लेखक विचारवंत आहेत. पहिली प्रतिक्रिया कृतीवर आहे. लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आपल्या मनातला राग व्यक्त करण्यासाठी असताना शाई फेकून निषेध व्यक्त करणं हे न समजण्यासारखे आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लोकांच्या टोकाच्या श्रद्धा आहेत. त्या दुखावण्याचा अधिकार कुणाला दिला नाही. त्यामुळे पद्धती चुकीची असली तरी हे आता फारच चाललं आहे. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आपण किती करणार आहोत याचा विचार केला पाहिजे, असं पाटील म्हणाले.