स्वत:चा काळा पैसा मतदारांच्या खात्यात Paytm ने ट्रान्सफर होणार आहे – Chandrakant Patil

| Updated on: Apr 03, 2022 | 8:02 PM

शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संशय व्यक्त केला.

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North by-election) पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे. शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संशय व्यक्त केला. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.