Pune | राज्यात सुरु असलेल्या गोष्टींवर मार्ग काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची-Chandrakant Patil

| Updated on: Aug 25, 2021 | 9:17 PM

राज्यात जे सुरु आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वांमध्ये संवाद आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पुढाकार घ्यायला हवा. आम्ही काय कोणाला घाबरत नाही, असे वक्तव्य भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पुणे : राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल जे बोललेत त्याबद्दल भाजप पक्ष म्हणून तक्रार करणार नाही. केसेस दाखल करून एकमेकांना कायमच जेलमध्ये टाकायचं का? भाजप कार्यकर्ता खूप खवळलाय त्याने केस केली तर करु शकतो. जसे जसे नातेसंबंध बदलतात तसे प्रसंग बदलता. नवरा बायकोमध्ये सुरवातीला खूप प्रेम असतं, नंतर काही न काही घटना घडत असतात, त्यात दोघेही समजदार असले की अशा घटना घडत असतात हे मान्य करतात, होत नसले तर घटस्फोट घेतात. दुभंगलेली मन एकत्र आणणं अवघड असतं, फार कमी वेळा पुन्हा एकत्र येणं शक्य होतं. 2014 ला सेना भाजपमध्ये वाद झाले, युती तुटली पण परत एकत्र आले. पण यावेळी तसं होणार आहे की नाही हे माहिती नाही. सध्याच्या परिस्थितीत काळ हेच उत्तर आहे, त्यामुळं पुढे काय होईल हे सांगता येत नाही. काळाच्या ओघात काय होईल हे पाहू. राज्यात जे सुरु आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वांमध्ये संवाद आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पुढाकार घ्यायला हवा. आम्ही काय कोणाला घाबरत नाही, असे वक्तव्य भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.