महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी

महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी

| Updated on: Apr 30, 2024 | 5:19 PM

चंद्रशेखर बानवकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीटच्या माध्यमातून चांगलाच हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच. देवेंद्र फडणवीसांच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद फडणवीसांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले

महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच, असे म्हणत चंद्रशेखर बानवकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद फडणवीसांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले. पुढे ट्वीटमध्ये बानवकुळे यांनी असे म्हटले की, उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही कितीही वायफळ बडबड करा. ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केलाय.

Published on: Apr 30, 2024 05:19 PM