Rohit Pawar यांनी विचार करून बोलावं, भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा; बघा काय केलं वक्तव्य?
VIDEO | भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरून भाजपच्या बड्या नेत्याचा पलटवार
नागपूर, २० सप्टेंबर २०२३ | अजित पवार यांचं महत्त्व कमी करण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी केलेल्या या टीकेवर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बावनकुळे यांनी इशारा देत असे म्हटले की, ‘रोहित पवार यांनी भाजपवर बोलताना जरा विचार करून बोलावं. आपल्या पक्षाचे संस्कार आणि संस्कृती बघितली पाहिजे. तिथे आमदारांच्या पोटातून आमदार आणि खासदारांच्या पोटातून खासदार तयार होतात, असा राष्ट्रवादी पक्ष आहे. जो शरद पवार यांच्या नेतृत्वात आहे. तर शरद पवार यांनी कुटुंबातील लोकांशिवाय बाहेरच्या लोकांना कधीच मोठं होऊ दिलं नाही. काही लोकं मोठे केलेत पण त्यांच्या पेक्षा मोठे केले नाही. मात्र भाजपमध्ये नेता हा आपल्यापेक्षा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, असे भाजप काम करते.’