वीर सावरकरांच्या अपमानात उद्धव ठाकरे यांचा सहभाग, भाजप नेत्याचा जोरदार निशाणा

वीर सावरकरांच्या अपमानात उद्धव ठाकरे यांचा सहभाग, भाजप नेत्याचा जोरदार निशाणा

| Updated on: Feb 26, 2023 | 2:59 PM

VIDEO | संजय राऊत यांच्या वीर सावरकर यांच्या वक्तव्यावर भाजपचं प्रत्युत्तर, बघा काय दिलं जशाच तसं उत्तर?

चंद्रपूर : आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांना वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत भाजपवर टीकास्त्र सोडले. वीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली तर भाजपच्या तोंडाला फेस येतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचं केंद्र आणि राज्यसरकार हे कधीही न होणारे अभूतपूर्व निर्णय घेतं, मोदीजी है तो मुमकीन है, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही नेहमीच सर्वोच्च मानलं आहे, उलट उद्धव ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत त्यांचा अपमान करण्यात सहभागी झाले आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Feb 26, 2023 02:59 PM