‘… त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं’, उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर भाजपच्या बड्या नेत्याचं प्रत्युत्तर
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या 'त्या' टीकेवर भाजपच्या बड्या नेत्याचं प्रत्युत्तर...'देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत आणि...'
मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा काल आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते केवळ मस्टरमंत्री का, असे म्हणत वाढीव उपमुख्यमंत्रीपदाच्या संख्येवरून खोचक टोला लगावला. या टीकेवरच आता भाजपचा बडा नेता, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही, हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्र मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.’ तर ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.