सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपच्या चित्रा वाघ अन् राष्ट्रवादीचे मेहबुब शेख आमने-सामने
tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने सुरू झालेला वाद भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्यात पेटलेला दिसतोय. चित्रा वाघ अन् मेहबुब शेख आमने-सामने, काय आहे प्रकरण बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने सुरू झालेला वाद भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्यात पेटलेला दिसतोय. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्यातील वाक् युद्ध दिवसेंदिवस आता वाढतच चाललंय. सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या लेक लाडकी योजनेवर टीका करत भाजपनं अनेक महिलांची तिकीट कापल्याचा आरोप केला होता. त्यावरून चित्रा वाघ आणि मेहबुब शेख हे आमने-सामने आलेत. तर काल चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. चित्रा वाघ म्हणाल्या, लक्षात आले असेल एव्हाना भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बेताल वक्तव्य कराल तर अशीचं ठोक उत्तर यापुढेही मिळतील, असा इशाराच त्यांनी दिला.