Chitra Wagh यांचा घणाघात, 'भास्कर जाधव विदूषक, गणपतीसोबत त्यांचंही विसर्जन करायला हवं'

Chitra Wagh यांचा घणाघात, ‘भास्कर जाधव विदूषक, गणपतीसोबत त्यांचंही विसर्जन करायला हवं’

| Updated on: Sep 12, 2023 | 5:46 PM

VIDEO | भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील टीकेवर प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल, बघा काय नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ | उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळगावात टीका केली होती. या टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्यावर टीका केली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी शब्दिक वार केले आहे. भास्कर जाधव विदूषक असून त्यांनी गणपती सोबत विसर्जित करायला हवं असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात विदुषकी करत फिरत आहे. उद्धव ठाकरे हे करमणुकीपुरते उरले आहेत आणि त्यांच्या कामात रिअॅलिटी यावी म्हणून आम्ही त्यांना विदुषकाचा ड्रेस पाठवत आहोत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र डागलं आहे.

Published on: Sep 12, 2023 05:46 PM