Chitra Wagh : “‘ते’ मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन् चालले हिंदुत्व…”, चित्रा वाघ यांचा खोचक टोला
संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपविला... अजून किती माती करून घेणार उद्धवजी..? असा हल्लाबोल करत चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना देखील खोचक सवाल केलाय.
मंदिर गणपतीचे आहे की हनुमानाचे हेही माहिती नाही आणि चालले हिंदुत्व सांगायला… असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांचा चांगलाच टोला लगावला आहे. तर चित्रा वाघ पुढे असेही म्हणाल्या की, संजय राऊत यांनी संपूर्ण पक्ष संपविला… अजून किती माती करून घेणार उद्धवजी..? असा हल्लाबोल करत चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना देखील खोचक सवाल केलाय. ‘८० वर्षापासून दादर रेल्वे स्थानकाबाहेर हमालांनी हनुमानाचं मंदिर बांधलं. त्याला रेल्वेने नोटीस पाठवली. तुमचं कोणतं हिंदुत्व. तुम्ही आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणता. मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे?’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सामनाची बातमी दाखवली यावेळी चुकून त्यांच्याकडून हनुमानाच्या मंदिराऐवजी गणपतीचं मंदिर असा उल्लेख करण्यात आला. यावरून चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत त्यांना घेरलं असल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेंनी या घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरही निशाणा साधला आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घणाघात केला. ‘तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे. इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे. हिंदू म्हणजे नुसती मतं नाही. त्यांना भावना आहे. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्यांचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी होतं का? हिंदुंची मते हवी. त्यांना भयभीत करायचं. घाबरवायचं आणि सत्तेत आल्यावर स्वत मंदिरं पाडायचं. मंदिरं कुठे सेफ आहेत. बांगलादेशात नाही आणि मुंबईतही नाही. एक है तो सेफ है म्हणता मग मंदिर कुठे सेफ आहे? आपल्या मुंबईतील मंदिर पाडण्याचा फतवा रेल्वे काढत आहे. तेव्हा फडणवीस आणि भाजपचं हिंदुत्व काय करत आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.