त्याचं मनस्वास्थ्य ठीक नाही, उर्फी जावेद हिच्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर कोण?
सामनातील अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आलेल्या टीकेनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
उर्फी जावेद हिच्यानंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर संजय राऊत आल्याचे दिसत आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत जेव्हापासून जेलमध्ये आले तेव्हापासून त्यांचे मनस्वास्थ्य ठीक नाही, हे त्यांच्या कृतीतून तर जाणवत होतंच पण आता ते त्याच्या लेखणीतून देखील जाणवत आहे. त्यावर फार काही बोलण्यात तथ्य नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. जिथे कोणत्याही अंधश्रद्धेला थारा नाही, हे राज्यातील प्रत्येक नागरिक जाणतो, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सामनातील अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आलेल्या टीकेनंतर दिली आहे. नवी दिल्लीतील भारतीय कार्यकारणी बैठकीचा आजचा दुसरा दिवस असून या बैठकीला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या उपस्थित होत्या. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले असून हा कार्यक्रम ऊर्जा देणारा असल्याचे म्हटले आहे.