चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर अन्….
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट करून काँग्रेसवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आपल्या एका विधानाने चांगलेत चर्चेत आलेत.
विधानसभेच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगलाय. भाजपच्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केलाय आणि हल्लाबोल केलाय. ‘काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याची टीका केली. एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात, की केवळ ‘जय भीम’ म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो, नितीनजी यात नवीन काय आहे ? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. तर पुढे त्या असंही म्हणाल्या, यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती आहे’, असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट