संताच्या ओव्या, अभंग अन् मोदी…, सोशल मीडियावरील फडणवीसांच्या अनोख्या प्रचाराची चर्चा
राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि रॅलीचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेहमीच प्रचारात आघाडी घेताना दिसतं. इतकंच नाहीतर सोशल मीडियाचा प्रभावी वापर ही भाजप नेत्यांकडून सर्वाधिक करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. अशातच सध्या चर्चा आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या अनोख्या प्रचार फंड्याची...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान परवा होत आहे. दरम्यान, अद्याप राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि रॅलीचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेहमीच प्रचारात आघाडी घेताना दिसतं. इतकंच नाहीतर सोशल मीडियाचा प्रभावी वापर ही भाजप नेत्यांकडून सर्वाधिक करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. अशातच सध्या चर्चा आहे ती म्हणजे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनोख्या प्रचार फंड्याची… . मोदी सरकारने केलेली कामे आणि संतवचन यांचा वापर ते करत आहेत. जगदगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांचे ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत त्यादृष्टीने मोदी सरकारमध्ये काय काम झाले आहेत, याची माहिती देत सोशल मिडियावर देवेंद्र फडणवीसांचा प्रचार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘संतवचन’ नावाने समाजमाध्यमावर सिरिज सुरु केली आहे. 15 एप्रिलपासून दररोज ते एक पोस्ट करत आहेत. संतांची ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत मोदी सरकारमध्ये काय काम झाली आहेत, त्याचा दाखला देत आहेत.