हा असंवेदनशीलतेचा कहर, नाना पटोलेंनी माफी मागावी; फडणवीसांचं ट्विट काय?
काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट नेमकं काय?
नाना पटोले हे एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. नाना पटोलेंनी माफी मागावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?
असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा! खासदार संजय धोत्रे जी यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Published on: Apr 05, 2024 05:39 PM
Latest Videos