Devendra Fadnavis | दिल्लीतील मंत्र्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस
केंद्रात कामं असतात त्यासाठी जावं लागतं त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असं सांगतानाच केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असंही त्यांनी सांगितलं.
नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीहून नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर येताच मीडियाने त्यांच्या भोवती गराडा घातला. यावेळी त्यांना मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. केंद्रात कामं असतात त्यासाठी जावं लागतं त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असं सांगतानाच केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ओबीसी आरक्षणाचा अधिकार हा राज्यालाच आहे. केंद्राला नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
Latest Videos