मोदीजींंचे फोटो लावून निवडून आले आणि सत्तेसाठी लाचार होऊन NCP सोबत गेले, फडणवीसांचा शिवसेनेला टोला
शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, असा जोरदार घणाघात शिवसेनेवर केला आहे. आणि सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेत, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये, असाही पलटवार त्यांनी केलाय.
पुणे : एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी जेव्हापासून महाविकास आघाडीला युतीची साद घातलीय तेव्हापासून राजकारण पुन्हा तापलंय. भाजपने (BJP) शिवसेनेला (Shivsena) पुन्हा हिंदुत्वावरून डिवचायला सुरू केलंय. विरोधी पक्षनेतेही कालपासून शिवसेनेवर याच मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. आज पुन्हा त्यांनी शिवसेनेचा उल्लख लाचार म्हणून केला आहे. शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली, असा जोरदार घणाघात शिवसेनेवर केला आहे. आणि सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेत, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये, असाही पलटवार त्यांनी केलाय. जेव्हापासून भाजप शिवसेनेची युती तुटलीय तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत आहे. आता भगव्यासाठी फक्त भाजप आहे, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत.
Latest Videos