कोरोना काळात नाशिकवर अन्याय, मी आलो अन् ऑक्सिजन मिळाला- फडणवीस

कोरोना काळात नाशिकवर अन्याय, मी आलो अन् ऑक्सिजन मिळाला- फडणवीस

| Updated on: Feb 21, 2022 | 5:51 PM

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता कोरोनाकाळातील लढ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. त्याची चुणूक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) यांच्या नाशिक (Nashik) येथील सभेत दिसली. त्यांनी राज्य सरकारला चोहोबाजूने घेरले. कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली अन् पुढचे सारे निभावले असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत. […]

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता कोरोनाकाळातील लढ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. त्याची चुणूक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) यांच्या नाशिक (Nashik) येथील सभेत दिसली. त्यांनी राज्य सरकारला चोहोबाजूने घेरले. कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली अन् पुढचे सारे निभावले असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत. येणाऱ्या काळात यावरून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हा सामना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच रंगणार आहे. कारण नाशिकमध्ये कोविडच्या दोन्ही लाटा गंभीर होत्या. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः तडफडावे लागले.