आता भगव्याची जबाबदारी आमची,  फडणवीस गरजले

“आता भगव्याची जबाबदारी आमची”, फडणवीस गरजले

| Updated on: Feb 21, 2022 | 5:15 PM

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने (Shivsena) जेव्हापासून घरोबा सुरू केलाय. तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यारून हिणवताना दिसून येत आहे. शिवसेनेचे हिंदूत्व आता पहिल्यासारखे राहिले नाही, शिवसेनेचे हिंदूत्व आता बेगडी हिंदूत्व झालं आहे, अशी टीका सतत भाजपकडून करण्यात येत आहे. आज नाशिकमध्ये फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिवसेनाला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचलं आहे. नाशिक महानगरपालिकवर भगवा फडकवा असे […]

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने (Shivsena) जेव्हापासून घरोबा सुरू केलाय. तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यारून हिणवताना दिसून येत आहे. शिवसेनेचे हिंदूत्व आता पहिल्यासारखे राहिले नाही, शिवसेनेचे हिंदूत्व आता बेगडी हिंदूत्व झालं आहे, अशी टीका सतत भाजपकडून करण्यात येत आहे. आज नाशिकमध्ये फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शिवसेनाला पुन्हा हिंदुत्वावरून डिवचलं आहे. नाशिक महानगरपालिकवर भगवा फडकवा असे आवाहन करतना भगव्याची जबाबदारी आता फक्त भाजपवर आहे. बाकीचे काय करत आहेत हे तुम्ही पाहत आहात, असे म्हणत शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. आज देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी चंग बांधला आहे. फडणवीसही कार्यकर्त्यांना बुस्टर देण्याचे काम करत आहे.

Published on: Feb 21, 2022 05:15 PM