Video : माहिती कुठून आली, असा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही- फडणवीस

Video : माहिती कुठून आली, असा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही- फडणवीस

| Updated on: Mar 12, 2022 | 2:04 PM

“विरोधी पक्षनेता म्हणून जरी मला प्रीव्हिलेज आहे , माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिलीय. बाहेर येऊ दिली नाही. उलट राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे. पोलीस जी चौकशी करतील, त्याला योग्य उत्तर देणार आहे. […]

“विरोधी पक्षनेता म्हणून जरी मला प्रीव्हिलेज आहे , माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिलीय. बाहेर येऊ दिली नाही. उलट राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे. पोलीस जी चौकशी करतील, त्याला योग्य उत्तर देणार आहे. कारण मी गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांनी चुकीची केस केली तरीही तपासात माझं सहाय्य मागितलंय म्हणून मी निश्चितपणे देईन. अपेक्षा एवढीच आहे, माहिती बाहेर कशी आली, याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, सहा महिने सरकारकडे अहवाल पडला होता. कुणी किती पैसे दिले, कोण कुठल्या जिल्ह्यात गेलाय, अशी संवेदनशील माहिती असताना, सरकारने काही कारवाई केली नाही. सरकारवर कारवाई झाली पाहिजे की, ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा प्रश्न आहे”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.