उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण… देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
गेल्या दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळून ४० हून अधिक जणांचा जीव गेला आणि त्या ठिकाणी मोदी रोड शो घेतायतं, काही संवेदना आहेत का, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला असता त्यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबईतील घाटकोपर येथे मेगा रोड शो झाला. यानंतर विरोधकांकडून भाजपसह महायुतीवर जोरदार टीका करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळून ४० हून अधिक जणांचा जीव गेला आणि त्या ठिकाणी मोदी रोड शो घेतायतं, काही संवेदना आहेत का, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला असता त्यांनी प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. ‘उद्धव ठाकरे यांना या दुर्घटनेवर बोलण्याचा अधिकार नाही कारण त्यांचंच सरकार याला जबाबदार आहे. त्यांच्याकाळात बेकायदेशीर परवानगी देण्यात आली. ही परवानगी मिळवणारा आणि होर्डिंग लावणारा तो व्यक्ती त्यांच्याच पक्षात आहे. अशा लोकांनी आम्हाला संवेदना शिकवू नये’, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना सुनावलं. लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानआधी ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांना थेट सवाल केलेत. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तरं दिलीत.