Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 रूपयांची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? श्रेयवादावरून फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
'कोणत्याही सरकारच्या निर्णयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. कारण मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी किंवा सर्व मंत्री काम करतो. यामुळे सरकारच्या सर्व निर्णयांचे आणि योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. लाडकी बहीण योजनेचे श्रेय म्हणावे तर ते तिन्ही पक्षांना नाही. आमच्या लाडक्या बहिणींना आहे', असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लाडक्या बहिणीचे श्रेय कोणाला? या प्रश्नावर बोलतना देवेंद्र फडणवीस की, लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. ती मुख्यमंत्र्यांच्या नावानेच आहे. मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख असतात, त्या सरकारचे आम्ही घटक आहोत, म्हणून आमच्या सगळ्यांची लाडकी बहीण आहे. यामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना ओवाळणी स्वरूपात काही रक्कम दिली त्यामुळे त्या आनंदात आहे. त्यामुळे कोणता भाऊ मोठा लहान याच्याशी त्यांना घेणंदेणं नाही, असे थेट देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पुढे त्यांनी असेही सांगितले की, राज्यात सध्या वेगवेगळ्या योजना चालल्या आहेत. लाडकी बहीणला जास्त फोकस मिळत आहे. त्यात इन्व्हॉल्मेंट अधिक आहे. ५० टक्के महिला त्यात आल्या, त्यामुळे त्याच्यावर फोकस अधिक आहे. आम्ही इतर योजनाही सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पिकविमा योजना आणली आहे. दीड हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिले आहे. कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देत आहोत. दूध उत्पादकांनाही सात रुपये देत आहोत. हे महत्त्वाचं काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहोत. केवळ दीड वर्षात १२ हजार मेगावॅटचं काम सुरू केलं. ते १८ महिन्यात पूर्ण करू. १६ हजार मेगावॅट वीज देण्याचं काम करू, असे आश्वासन त्यांनी दिलं.