‘राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही’, भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात आजपासून दौरा सुरू होत आहे आणि त्यात उत्तर महाराष्ट्रात मोदींची पहिली सभा होत असून 14 तारखेपर्यंत मोदींच्या दहा सभा महाराष्ट्रात होणार आहे, अशी माहिती भाजपच्या बड्या नेत्यानं दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभेतील भाषणं चांगलीच गाजताना दिसताय. आपल्या मनसे पक्षाच्या उमेदवारांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रचारसभांमधून राज ठाकरे हे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधताना दिसताय. दरम्यान, यंदा सत्ता द्या, ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे उतरवतो, असं आवाहनच मतदारांना राज ठाकरेंनी केलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला असता त्यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, राज ठाकरे हे आता वेगळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे यांचं आम्हाला समर्थन होतं त्यांनी आम्हाला मदतही केली होती. पण आता ते वेगळं बोलताय. त्यांना आणि त्यांचे पक्षाला काय वाटतं ते आता बोलत आहे. राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाहीत, त्यामुळे आता राज ठाकरे काय बोलताय? हा त्यांचा प्रश्न आहे, असं स्पष्ट मत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

'संमेलनात ५० लाख आणि मर्सिडीज देऊन सहभागी?',गोऱ्हेंबद्दल राऊतांचा दावा

खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही..., मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार

'दोन मर्सिडीजवर एक पद', नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप

'ते गयेगुजरे, त्यांना चारदा आमदारकी दिली, त्यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज'
