चर्चा तर होणारच ! गिरीश महाजनांचा वाढदिवस अन् जाहिरातीत अजितदादांसह शरद पवार यांचा फोटो ?

चर्चा तर होणारच ! गिरीश महाजनांचा वाढदिवस अन् जाहिरातीत अजितदादांसह शरद पवार यांचा फोटो ?

| Updated on: May 17, 2023 | 9:23 AM

VIDEO | पुन्हा एकदा अजितदादांची चर्चा, गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत फडणवीस यांच्यासह शरद पवार, अजित पवार यांचा फोटो

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रात जाहीरातबाजी केली. मात्र भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो छापण्यात आल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पानभर असलेल्या या जाहीरातीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहिरात छापण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार, शरद पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचाही फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचे फोटो देण्यात आले आहे. मात्र या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा असल्याने सर्वांचं लक्ष वेधत पुन्हा अजित दादांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इतकंच नाही तर अजितदादांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असंही लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही जाहिरात दिली आहे. त्यावर या बँकेचे चेअरमन संजय पवार यांचाही फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या जाहीरातीत भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या फोटोत अजितदादा आणि शरद पवार यांचे फोटो छापण्यात आल्याने तर्कवितर्कही सुरू झाले आहेत.

Published on: May 17, 2023 09:22 AM